देशातील वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याशी संवाद साधून, त्यांनी सैन्याच्या सुविधा आणि कौशल्य सामान्य जनतेसाठी खुले करून द्यावे असे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय सैन्य पुन्हा एकदा भारतीयांच्या मदतीसाठी संकटकाळात धावले आहे.
त्याबरोबरच संरक्षण मंत्र्यांनी सैन्य प्रमुखांना स्थानिक कमांडरने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून सैन्याकडून शक्य तेवढी सर्व प्रकारची मदत द्यावी असे देखील सांगितले आहे. त्यानुसार सैन्याच्या सचिवांनी भारतीतल सर्व ६७ छावणी क्षेत्रांना छावणी क्षेत्रातील निवासी आणि छावणी क्षेत्राबाहेरील निवासी यांनी आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हे ही वाचा:
आज लस उत्पादकांसोबत मोदींचा संवाद
सहा महिन्यात भारतात बनणार लिथियम-आयन बॅटरी
ड्रायव्हर गेले गावाला, ऑक्सिजन देऊ कसा तुम्हाला!
भारतात कोविड फोफावत आहे. अनेक राज्यात कोविडमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या बेतावर आली आहे. आता भारतीय सैन्य पुन्हा एकदा या आपात्कालिन परिस्थितीत देशाच्या पाठी ठामपणे उभे राहिले आहे. यामुळे नक्कीच देशवासियांनी दिलासा मिळणार आहे.
देशातील कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरण देखील वाढवण्यात येणार आहे. आता तर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना सरसकट लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन सोबतच स्पुतनिक-५ ह्या लसीचा वापर देखील लवकरच भारतात केला जाणार आहे.