काश्मीर बाहेरच्या नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी त्यांना लक्ष्य करण्यास दहशतवाद्यांनी सुरू केले आहे. या दहशतीमुळे अनेक नागरिकांनी पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. दहशतीला आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यानेही मोठी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेसाठी सैन्याने पुंछ आणि राजोरीमधील घनदाट जंगलाला वेढा घातला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, अशा सूचना करण्यात येत आहेत.
स्थानिकांचा फायदा घेत आणि त्यांच्या आडून दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात लोकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी सैन्याने ही मोहीम आखली असून मशिदीच्या भोंग्यावरून घरातून बाहेर पडू नका अशा सूचना केल्या जात आहेत.
हे ही वाचा:
जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
‘आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब’
नागरिकांनी घरातच थांबावे, जंगलाच्या दिशेने अजिबात जाऊ नये, असे सांगण्यात येत आहे. जे नागरिक घरातून बाहेर पडले आहेत त्यांनी लवकर घरात परतावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच खाण्या- पिण्याच्या वस्तूंचा साठा करून ठेवावा, असेही सांगण्यात येत आहे.
पुंछ आणि राजोरी भागात ही मोहीम सुरू असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण भागाला सैन्याने वेढा दिला आहे. पॅरा कमांडर आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या चकमकीत भारताच्या नऊ जवानांना वीरमरण आले आहे.