… आणि जवानांनी पर्यटकांची केली सुटका

… आणि जवानांनी पर्यटकांची केली सुटका

कठीण समयी भारतीय जवान हे मदतीला नेहमी पुढे असतात याचा अनुभव काही पर्यटकांना आला. जम्मू काश्मीरमध्ये काही पर्यटक संकटात असताना जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली. नदीत हे पर्यटक अडकलेले असताना त्यांची जवानांनी सुटका केली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जम्मू काश्मीरमधील सिंध नदीच्या प्रवाहात काही लोक अडकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोनमर्ग येथे चार जण सहलीसाठी आले होते. यादरम्यान बालटालजवळ सिंध नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचे वाहन त्यात अडकले. बालटाल-डोमेलमध्ये अमरनाथ यात्रेसाठी तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या बटालियनच्या गस्ती दलाने नदीच्या प्रवाहात वाहन अडकल्याची माहिती भारतीय लष्कराला दिली. त्यानंतर भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून या चार जणांची सुखरूप सुटका केली.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात

मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या

मुलांवर आंदोलनांचे हे कसले ‘संस्कार’

भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक

जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर सुरक्षा दलाकडून सातत्याने कारवाई केली जात असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला आणि जम्मू काश्मीर पोलिसांना यश येत आहे. गेल्या २४ तासांत पाच दहशतवादी मारल्याची माहिती असून यंदाच्या वर्षात १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

Exit mobile version