जवानांनी अशी साजरी केली लोहरी

जवानांनी अशी साजरी केली लोहरी

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. लोहरी, बिहु, पोंगल अशी अनेक नावांनी या सणाला देशभरात ओळखले जाते. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण भारतीय लष्करातील जवानांनीही मोठ्या उत्साहात साजरा केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

जम्मू काश्मीरच्या बारमुल्ला जिल्ह्यात भारतीय जवानांनी लोहरी साजरी केली. बीएसएफच्या जवानांनी शेकोटी पेटवून लोहरी मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या दरम्यान त्यांनी भारत माता की जय या घोषणाही दिल्या आणि लोहरीच्या शुभेच्छाही दिल्या.  त्यानंतर पंजाबी गाण्यावर या जवानांनी ठेका धरला होता. यावेळी जवानांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:

मंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार

…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

देशाचे संरक्षण करण्यासाठी हे जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहत असतात. मात्र, कर्तव्य चोख बजावत असतानाच ते त्यांचा उत्साह कुठेही कमी पडू देत नाहीत. काही दिवसांपूर्वी असाच भारतीय जवानांचा एक व्हिडीओ समोर आला होता. जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवान त्यांचे कर्तव्य बजावत असताना या तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवान ‘खुकरी नृत्य’ करत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओला पाहून नागरिकांनी त्यांच्या या उत्साहाला सलाम केला होता.

Exit mobile version