अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४० वाजता लष्कराचे हेलिकॉप्टर रुद्र कोसळले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून शोध मोहीम सुरू केली आहे. लष्कराचे हेलिकॉप्टर लष्कराच्या टुटिंग मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर होते.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या रुद्र हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी तीन जण बसले होते. भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर नेहमीच्या सरावाप्रमाणे उड्डाण करत होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतीय सैन्यासाठी रुद्र या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.
अप्पर सियांगचे पोलीस अधीक्षक जुम्मर बसर यांनी दिलेल्या माहितीनुसार,अपघात ठिकाणी बचाव पथक पाठवण्यात आले आहे. अपघात स्थळ अत्यंत दुर्गम भागात आहे. हा परिसर कोणत्याही रस्त्याने जोडलेला नाही. अशा परिस्थितीत बचाव कार्यात अडचणी येत होत्या. ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण मुख्यालयापासून काही अंतरावर आहे.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
या महिन्याच्या सुरुवातीला, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास, अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात नियमित उड्डाण करताना आर्मीचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. जामिथांग सर्कलच्या बीटीके भागाजवळील न्यामजुंग चू येथे अग्निशमन विभागाच्या बॉल जीओसीला आपले नियमित कर्तव्य पार पाडल्यानंतर चीता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागात परतत होते.