लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!

फायर अँड फ्युरी कॉर्प्सने दिली माहिती

लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!

भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करणात आले. हा पुतळा चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पँगॉन्ग तलावाच्या किनार्‍यावर १४,३०० फुट उंचीवर उभारण्यात आला आहे.

लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्प्सने ही माहिती दिली. गुरूवारी (२६ डिसेंबर) रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या फायर अँड फ्युरीचे लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ट्वीटकरत म्हटले, शौर्य, दूरदृष्टी आणि दृढ न्यायाचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन हे लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला, एससी, एसएम, व्हीएसएम, जीओसी फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि द मराठा लाइट इन्फंट्री यांच्या हस्ते करण्यात आले. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होताना लडाखची ती युद्धभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमली. यावेळी जवानांनी प्रचंड उत्साहात पोवाडे आणि शौर्य गीते सादर केली.

हे ही वाचा : 

भिंतीला हिरवा रंग, फुले-चादर चढवली, भाजपा माजी आमदाराने हिरव्या रंगावर दिला भगवा रंग!

दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू!

ज्वेलर्स मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटात संपादक 

अझरबैजानच्या विमान अपघाताबद्दल पुतीन यांनी मागितली माफी

Exit mobile version