अ‍ॅक्सेल श्वानाने झेलल्या तीन गोळ्या; पण त्याने दहशतवाद्यांना शोधले

अ‍ॅक्सेल श्वानाने झेलल्या तीन गोळ्या; पण त्याने दहशतवाद्यांना शोधले

काश्मीरच्या बारामुल्ला भागातील वानिगमबाला जिल्ह्यात शनिवारी झालेल्या दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान अ‍ॅक्सेल हा लष्कराचा श्वान आपले कर्तव्य बजावताना शहीद झाला. या कारवाईच्या आपली सेवा बजावताना त्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. हलक्या तपकिरी रंगाचा दोन वर्षे वयाचा अ‍ॅलेक्स २६ लष्करी श्वान पथकाचा एक भाग होता.

३०  जुलै रोजी, काश्मीरमधील बारामुल्ला, जिल्हा वानिगंबला येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, लष्करी प्राणघातक कॅनाइन डॉग ‘एक्सेल’ याने कर्तव्य बजावताना आपला जीव दिला. जेव्हा त्याला तीन वेळा गोळ्या लागल्या तेव्हा अ‍ॅक्सेल इमारत साफ करण्यासाठी सेवा देत होता. अ‍ॅलेक्स सोबत बालाजी हा आणखी एक श्वानही या कारवाईत सहभागी होता. आधी बालाजी श्वान आपले कर्तव्य बजावण्यासाठी इमारतीमध्ये शिरला. त्या पाठोपाठ बॉडी कॅम लावून अ‍ॅक्सेल आपले कर्तव्य बजावण्यासाठी इमारतीच्या आत गेला होता. इमारतीच्या पहिल्या खोलीत आपले काम चोखपणे बजावल्यावर अ‍ॅक्सेलने दुसऱ्या खोलीत प्रवेश केला. इतक्यात एका दहशतवाद्याचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर अ‍ॅक्सेलने जेमतेम १५ सेकंद हालचाल केली आणि नंतर तो पडला.

लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या या चकमकीत अख्तर हुसेन भट हा दशहतवादी ठार झाला तर तर एका पोलीस कर्मचाऱ्यासह लष्कराचे दोन अधिकारी जखमी झाले. पाच तास सुरू असलेल्या या चकमकीनंतर अ‍ॅक्सेलचे पार्थिव इमारतीतून काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी ५४  सशस्त्र दल पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. अहवालांनुसार, अ‍ॅक्सेलला दहा अतिरिक्त जखमा आणि फेमरचे फ्रॅक्चर झाले होते.

कार्यक्षम होता अ‍ॅक्सेल

अ‍ॅक्सेल सारख्या प्रशिक्षित हल्लेखोर कुत्र्यांचा वापर अतिरेक्यांच्या लपलेल्या ठिकाणांना पकडण्यासाठी केला जातो. त्यांना दहशतवाद्यांना प्राणघातक जखमा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अ‍ॅक्सेल एक कार्यक्षम के ९ अधिकारी होता आणि भूतकाळात अनेक यशस्वी कारवाईचा भाग होता. हे प्रशिक्षित कुत्रे, कॅमेरे लावल्यावर, दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रे आणि दारुगोळा यांसारख्या इतर तपशीलांसह दहशतवाद्यांची अचूक स्थान निश्चित करण्यात मदत करतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

संजय राऊत ईडीचणीत

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

सकाळीच ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झा

वणीगम गावात चकमक

या भागात एका पाकिस्तानी नागरिकासह किमान तीन दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई सुरू केली होती. त्यानंतर वाणीगम गावात चकमक सुरू झाली.

अ‍ॅक्सल दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होता

दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, बजाज आणि एक्सेल या दोन लष्करी कुत्र्यांना बॉडी कॅम्स घालून लक्ष्याच्या घरात पाठवण्यात आले. यादरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि लपलेल्या दहशतवाद्यांनी अ‍ॅक्सेललाही लक्ष्य केले. अ‍ॅक्सेलचा जागीच मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्करी अधिकाऱ्यांनी वाहिली आदरांजली

काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय लष्कराच्या शूर स्निफर कुत्र्याचा, अ‍ॅक्सेलला जीव गमवावा लागल्यानंतर, रविवारी, ३१ जुलै रोजी बारामुल्ला अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी अ‍ॅक्सेल श्वानाला आदरांजली वाहिली.

Exit mobile version