भारतीय लष्कराने चीनच्या सीमेजवळ केला दमदार सराव!

भारतीय लष्कराने चीनच्या सीमेजवळ केला दमदार सराव!

भारतीय लष्कराच्या सुमारे ६०० पॅराट्रूपर्सनी या आठवड्यात सिलीगुडी कॉरिडॉरजवळ एअरबोर्न इन्सर्शन आणि रॅपिड रिस्पॉन्सचा दमदार सराव केला. चीनला लागून असलेल्या भारताच्या उत्तर सीमेजवळील महत्त्वाच्या भागात गेल्या तीन आठवड्यांतील हा दुसरा सराव आहे. हा कॉरिडॉर नेपाळ, भूतान आणि बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या जमिनीचा भाग आहे.

२४ आणि २५ मार्चला झालेल्या या सरावात सुमारे ६०० सैनिकांचा समावेश होता. या सरावामध्ये सैनिकांना प्रगत हवाई प्रवेश तंत्र किंवा सैनिकांचे एअर ड्रॉपिंग, पाळत ठेवणे आणि लक्ष्य याचा समावेश होता. भारतीय लष्कराने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

यापूर्वी अशाच प्रकारचा सराव मार्चच्या सुरुवातीला महत्त्वाच्या सिलीगुडी कॉरिडॉरवर करण्यात आला होता. मागील सराव दरम्यान, भारतीय लष्कराच्या हवाई आणि विशेष दलांनी त्यांच्या हवाई प्रवेश क्षमतेचा आणि सरावात उत्तर सीमेवर जलद प्रतिसादाचा अभ्यास केला होता. ज्यामध्ये तब्बल २० हजार फूट उंचीवरून झेप घेणे या प्रकारचाही समावेश होता. सिलीगुडी हा भाग लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि ईशान्य प्रदेशाला उर्वरित भारताशी जोडतो.

हे ही वाचा:

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

भारतात सुरु होणार २१ नव्या सैनिकी शाळा

वक्फ बोर्ड आणि सच्चर रिपोर्टची सच्चाई!

सिलीगुडी कॉरिडॉर हा नेपाळ आणि बांगलादेश त्याच्या आसपास आहेत. हा कॉरिडॉर १९४७ मध्ये बांधण्यात आला होता. हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असल्याने भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल आणि पश्चिम बंगाल पोलिस येथे नेहमी गस्त घालत असतात.

Exit mobile version