म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी

मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर सुमारे २१२ भारतीय सीमा ओलांडून म्यानमारमध्ये पळून गेले होते. अखेर भारतीय लष्कराच्या मदतीने हे सर्व भारतीय सुखरूप मायदेशी पोहोचले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी या भारतीयांना सुखरूप राज्यात पोहोचवल्याबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत.

 

‘३ मे रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या मोरेह शहरातून सुमारे २१२ भारतीय नागरिक (सर्व मैतेई समाज) सीमा ओलांडून सुरक्षेसाठी म्यानमारमध्ये गेले होते. मात्र ते आता सुरक्षितपणे भारत भूमीत परतले आहेत,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी ‘एक्स’वर दिली आहे. ‘या भारतीयांना घरी सुखरूप पोहोचवण्यात भारतीय लष्कराने मोलाची कामगिरी बजावली. यासाठी मी जीओसी ईस्टर्न कमांड लेफ्टनंट जनरल आरपी कलिता, जीओसी तीन कमांडर लेफ्टनंट जनरल एच एस साही, कर्नल राहुल जैन यांचे आभार मानतो,’ अशा शब्दांत भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

‘फलाटावरील प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली नसती तर तो वाचला असता!’

फोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

अंतिम पंघलने पुन्हा जिंकले विश्वविजेतेपद; २० वर्षांखालील किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सद्भावना दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा शांतता नांदणे आणि परिस्थिती पूर्वपदावर येणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ‘प्रत्येकात मतभिन्नता असू शकते. मतांतरे असू शकतात. परंतु लोकांनी केवळ स्वत:चा विचार करण्याऐवजी सर्वांच्या हिताच्या दृष्टीने विचार करावा,’ अशी अपेक्षा व्यक्त करून ‘आता शांतता पुनर्स्थापित करणे हेच महत्त्वाचे ध्येय आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

‘लोकांनी अपार मेहनत करणे गरजेचे आहे, तरच विकासकामाचा वेग पुन्हा गाठता येईल आणि आपल्या राज्याची एकात्मकता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल होऊ शकेल,’ असेही ते म्हणाले.
मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे १६० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेघर झाले आहेत.

Exit mobile version