आयरिश टाइम्सने संपादकीयच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लिखाण केल्यानंतर आयर्लंडमधील भारतीय राजदूतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या संपादकीयमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना त्यांनी तुर्कीचे इस्लामी नेते रेसेप एर्दोगन यांच्याशी देखील केली आहे. मोदी यांनी हिंदू राष्ट्रात हिंदू राष्ट्रवाद स्वीकारल्यामुळे तिथे मुस्लीमविरोधी वातावरण आणि तणाव वाढला असल्याचे म्हटले आहे. पारंपारिक नेहरू प्रेरित धर्मनिरपेक्षता नष्ट झाल्याचेदेखील म्हटले आहे.
सोमवार, १५ रोजी आयर्लंडमधील भारतीय राजदूत अखिलेश मिश्रा यांनी आयरिश टाईम्सने संपादकीयमध्ये लावलेल्या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी लिहिले कि, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व, उत्तम चारित्र्य, सचोटी आणि नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक प्रशासन आणि शाश्वत विकासावर विचार असलेल्या नेतृत्वामुळे.
हेही वाचा..
मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!
दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?
ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक
भाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!
ते कोणत्याही मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित नसल्यामुळे त्यांचे वैयक्तिक जीवन भारतातील आणि इतर विकसनशील देशांतील लाखो सामान्य लोकांना प्रेरणा देते,” असे म्हटले आहे. अखिलेश मिश्रा म्हणाले की मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या परिसंस्थेला तडा देण्याच्या निर्णयामुळे भारतीय पंतप्रधानांची लोकप्रियता वाढली आहे. जमिनीवर कृती करताना लोकशाहीचे चैतन्य पाहण्यासाठी भारतातील लोक उत्साहित आहेत. तळागाळात मोठ्या प्रमाणावर अंबलबजावणी केली जात आहे.
राजकीय सूडबुद्धीचे आरोप फेटाळून लावताना अखिलेश मिश्रा यांनी आयरिश टाइम्सने भारताचे असहिष्णु, हिंदू बहुसंख्य राष्ट्र म्हणून वर्णन केल्याबद्दल निंदा केली. ८० टक्के हिंदू बहुसंख्य राष्ट्र म्हणून भारताचे एक रूढीवादी वर्णन अत्यंत दिशाभूल करणारे आहे कारण हिंदू धर्म बुद्ध किंवा ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या शतकांपासून मूळतः सर्वसमावेशक आणि मूलभूतपणे बहुलवादी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.