हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) नुकतेच हॉक आय या नव्या स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपनची (एसएएडब्ल्यु) ओडिशा येथे चाचणी केली. भारतीय हवाई दल आणि नौसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या ट्रेनिंग जेट हॉकमध्ये केलेले हे नवे बदल आहेत.
स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपनची (एसएएडब्ल्यु) हे शत्रुचे विमानतळ, रडार, बंकर, टॅक्सी वे इत्यादी उध्वस्त करायला वापरण्यात येणारे नवे शस्त्र आहे. हे भारतातील पहिलेच संपूर्ण स्वदेशी बनावटीचे शस्त्र आहे. हे शस्त्र डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) मार्फत विकसित करण्यात आली आहे. या शस्त्राचा पल्ला १०० किमी असून हे भारतीय हवाई दलाच्या जग्वार या विमानामार्फत डागण्यात आले.
हे भारतातील हॉक एमके १३२ या शिकावू विमानाच्या सहाय्याने डागण्यत आले. एचएएल सातत्याने आत्मनिर्भर भारत या संकल्पेनुसार काम करत आहे. कंपनीच्या मालकीचे हॉक-आय हा विविध प्रणाली आणि शस्त्रांच्या प्रमाणीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा पाया आहे. एचएलचे अध्यक्ष आर माधवन यांनी ही माहिती दिली. या शस्त्राच्या चाचणीसाठीच्या विमानाचे सारथ्य एचएएलच्या शिकावू विमानाचे वैमानिक विंग कमांडर (निवृत्त) पी अवस्थी आणि एम पटेल यांनी केले.
एचएएल आणि डीआरडीओने यापूर्वी तयार केलेल तेजस हे संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान आता भारतीय हवाई सेनेचा अविभाज्य भाग झाले आहे. भारत आता तेजस इतर राष्ट्रांनाही देणार आहे.