अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भारतीय सेनेत अग्निवीरांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे. भारतीय लष्कर आणि नौदलामध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांदेखील संधी दिली आहे. आता महिला अग्निवीर म्हणून लवकरच भारतीय वायुसेनेत दाखल होणार आहेत. हवाईदलाने याबाबत माहिती दिली आहे.
पुढील वर्षांपासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी दिली आहे. ते म्हणाले, पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. महिलांची भरती करण्यापूर्वी आम्हाला सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. तसेच महिला सैनिकांना कोणतीही अडचण येऊ नये, असे वातावरण तयार करण्यात येणार आहे. यावर्षी वायुसेनेकडून तीन हजार अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे.
भारतीय वायुदलात अधिकारी पदावर महिला आहेत. मात्र, एअरमॅन सैनिक रँकमध्ये महिलांचा समावेश नाही. त्यामुळे अग्निविरांच्या माध्यमातून प्रथमच वायुसेनेत महिला सैनिक म्हणून रुजू होणार आहेत. पुढील वर्षापासून अग्निवीरांच्या भरतीत तीन टक्के राखीव जागा महिलांसाठी ठेवली जाणार आहे. यानंतर, दरवर्षी त्यात हळूहळू वाढ केली जाईल आणि चार वर्षांत दहा टक्के महिलांसाठी राखीव जागा वाढवण्याचे लक्ष्य आहे. पुढे मग वर्षाचा आढावा घेऊन त्यानुसार किती टक्के महिलांची भरती करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.
वायुसेनेत एकूण ३९ विभाग आहेत. महिला अग्निविर कोणत्याही विभागाचा भाग असू शकतात. अग्निवीर म्हणून चार वर्षे पूर्ण केल्यानंतर ते कायमस्वरूपी वायुसेनेचा भाग बनतील. वायुसेनेत भरती होणार्या अग्निवीरांना सुरुवातीला कोणताही ट्रेड दिला जाणार नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला अग्निविरांना कुणालाही एका विभागापुरते मर्यादित ठेवायचे नाही. त्यामुळे चार वर्षे अग्निवीर असताना त्यांना सर्व प्रकारची कामे शिकवली जातील आणि त्या आधारे त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. अग्निविरांची चार वर्षे पूर्ण झाल्यावर, कायमस्वरूपी असणार्यांपैकी जास्तीत जास्त २५ टक्के एअरमन बनतील आणि त्यांना पुन्हा एक विभाग दिला जाईल.
हे ही वाचा:
आयसिजी आणि एटीएसची गुजरातमध्ये मोठी कारवाई, ६ जण अटक
नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ‘इतकी’ मदत जाहीर
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली
दरम्यान, आज भारतीय वायु सेनेला ९० वर्षे पूर्ण होत आहेत. यदिनानिमित्त चंदीगडमधील गाझियाबाद येथील हिंडन एअर फोर्स स्टेशनच्या बाहेर पहिल्यांदाच एअर फोर्स डे परेडचे आयोजन करण्यात आले आहे.