आशियाई स्पर्धेमध्ये भारताची दमदार कामगिरी अजूनही सुरूच असून आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये सोमवारची सुरुवातही पदक कमाईने झाली आहे. सोमवार, २ ऑक्टोबर रोजी भारताच्या पुरूष आणि महिला रोलर स्केटिंग टीमने ३ हजार मीटर स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. या दोन पदकांनंतर आता भारताची पदकसंख्या ही ५७ झाली आहे.
आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने कांस्य पदक जिंकून दमदार सुरूवात केली. संजना, कार्तिका, हीरल आणि अरथ्य या खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने ३ हजर मीटर स्पीड स्केटिंग रिले स्पर्धेत ४:३४.८६१ अशी वेळ नोंदवली. या पदक कमाईचा आनंद साजरा करत असतानाचं पुरुषांच्या संघानेही पदकाला गवसणी घातली.
हे ही वाचा:
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक केले ‘ट्रॅप’
पुरूषांच्या ३ हजार मीटर स्पीड स्केटिंग रिले स्पर्धेत आर्यन पाल, आनंद कुमार, सिद्धार्थ राहुल कांबळे आणि विक्रम यांनी ४:१०.१२८ अशी वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. सध्या भारताच्या खात्यात ५७ पदके असून यात १३ सुवर्ण पदके, २१ रौप्य पदके आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे.