28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषहॉकीत जिंकलो; भारताला चौथे कांस्य !

हॉकीत जिंकलो; भारताला चौथे कांस्य !

भारताने स्पेनला हरवून सामना २-१ ने जिंकला

Google News Follow

Related

भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध स्पेन संघात पार पडलेल्या गुरुवारच्या (८ ऑगस्ट) सामन्यात भारतीय संघाने स्पेनला धूळ चारत २-१ असा सामना जिंकला आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले. भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. दरम्यान, भारताने हॉकीमध्ये आतापर्यंत १३ पदके जिंकली आहेत त्यामध्ये ८ सुवर्ण पदके आहेत. यासह यंदाच्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारताचे हे चौथे कांस्य पदक आहे.

स्पेनविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग भारताच्या विजयाचा हिरो ठरला. या अटीतटीच्या सामन्यात त्याने दोन गोल केले. या विजयासह भारताने आपला महान गोलरक्षक पीआर श्रीजेशला ऑलिम्पिक पदकासह निरोप दिला. भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीआर श्रीजेशने हा आपला शेवटचा सामना असल्याचे आधीच जाहीर केले होते. या विजयासह तो निवृत्त झाला आहे.

पहिल्या सत्रात भारत आणि स्पेन यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमणे केली. मात्र एकही गोल होऊ शकला नाही. शेवटी पहिले सत्र ०-० असा बरोबरीत संपले. मात्र, दुसऱ्या सत्रातील सामन्यातील पहिला गोल स्पेनने केला. दुसऱ्या सत्राच्याच्या १२व्या मिनिटाला स्पॅनिश संघाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. स्पेनने या संधीचा पुरेपूर फायदा घेत गोल करत भारतावर १-० अशी आघाडी घेतली. स्पेनकडून मार्को मिरालेसने गोल केला.

हे ही वाचा:

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर !

विनेशचे काका महावीर फोगाटनी काँग्रेसला केले चितपट

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर!

विनेश ही अनुभवी खेळाडू, तिला नियमांचीही जाणीव का नव्हती? सायनाने विचारला सवाल

दुसऱ्या सत्राच्याच्या शेवटच्या मिनिटाला मात्र भारताने गोल करत बरोबरी केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला बरोबरी मिळवून दिली. हाफ टाईम आला तेव्हा स्कोअर १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर भारताने तिसऱ्या सत्राच्याच्या सुरुवातीलाच गोल करत सामन्यात आघाडी घेतली. भारताने हा गोलही पेनल्टी कॉर्नरवरून केला. पुन्हा एकदा कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

भारताने ३३व्या मिनिटाला हा गोल केला आणि आघाडी घेत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. टीम इंडियाला आणखी गोल करता आला नसला तरी स्पेनलाही गोल करू दिला नाही. वेळ संपत असल्याचे पाहून स्पेननेही शेवटच्या तीन मिनिटांत आपल्या गोलरक्षकाला बाहेर पाठवले. यानंतर त्याने ऑलआऊट हल्ला केला. एका वेळी ११ स्पॅनिश खेळाडू भारतीय हाफमध्ये दिसत होते. मात्र भारतीय बचावपटूंनी स्पेनला बरोबरी साधण्याची एकही संधी दिली नाही आणि भारताने आपल्या नावावर विजय प्राप्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा