वानखेडे कसोटी भारताने चौथ्या दिवशीच जिंकली

वानखेडे कसोटी भारताने चौथ्या दिवशीच जिंकली

मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत विरुद्ध न्यूझीलंड सुरू असलेला दुसरा कसोटी सामना भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी तब्बल ३७२ धावांनी खिशात घातला. चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी झटपट बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका १- ० ने जिंकली.

न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर १४० धावा करून आपले पाच फलंदाज गमावले होते. न्यूझीलंडला विजयासाठी ४०० धावांची गरज असताना चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने १६७ धावांपर्यंत मजल मारली, तर भारतीय गोलंदाजांनी पाच विकेट्स घेत भारताचा विजय निश्चित केला.

पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर मयंक अग्रवालच्या दमदार १५० धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२५ धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून अजाझ पटेलने याने गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाला भारतीय गोलंदाजांनी ६२ धावांमध्ये रोखले. त्यानंतर न्यूझीलंडला फॉलोऑन न देता भारतीय संघ पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आला.

हे ही वाचा:

भारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन

संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण अजरामर

पाठीवर बॅग आहे?? ​मग काळजी घ्या…वाचा सविस्तर!

भारताने तिसऱ्या दिवशी दुसरा डाव ७ बाद २६७ असा घोषित करत न्यूझीलंडला तब्बल ५४० धावांचे लक्ष्य दिले. ५४० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर १४० धावा करून आपले पाच फलंदाज गमावले. कसोटी मालिकेत भारताचेच पारडे जड असल्याचे चित्र कालच स्पष्ट झाले असताना आज चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा उर्वरित संघ माघारी धाडत विजय निश्चित केला. भारताकडून अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या तर, अक्षर पटेल याने एक विकेट घेतली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या.

Exit mobile version