अश्विनच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघ ढेपाळला

भारताने २३व्यांदा केले पराभूत

अश्विनच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघ ढेपाळला

भारताने वेस्ट इंडिजविरोधात ऐतिहासिक २३व्या विजयाची नोंद केली. त्याहून अधिक विजय भारताने ऑस्ट्रेलिया (३२) आणि इंग्लंड (३१)विरोधात मिळवले आहेत. तर, न्यूझीलंड आणि श्रीलंकेला प्रत्येकी २२ सामन्यांत पराभूत केले आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. भारताने एक डाव आणि १४१ धावांनी सामना खिशात टाकून विश्व टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ची चांगली सुरुवात केली.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याने पहिल्या डावात १५० धावा केल्या. तर, भारताने पहिल्या डावात पाच विकेट गमावून ४२९ धावा केल्या. त्यामुळे भारताला २७१ धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजच्या संघाला दुसऱ्या डावात अवघ्या १३० धावांतच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे भारताचा विजय झाला. त्यामुळे भारताने या मालिकेत १-०ने आघाडी मिळवली आहे. आता दोन्ही संघांदरम्यान दुसरा सामना त्रिनिनाद येथे रंगेल.

यशस्वी ठरला सामनावीर

भारतासाठी यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्माने शतकी भागिदारी केली. विराट कोहलीने अर्धशतक केले. भारतीय संघाला केवळ एकच डाव खेळण्याची संधी मिळाली. गोलंदाजांमध्ये भारताच्या रविचंद्रन अश्विनने चांगला खेळ केला. त्याने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. पहिल्या डावात १७१ धावा करणाऱ्या यशस्वीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अश्विनची मोलाची कामगिरी

अश्विनने सामन्यात एकूण १२ विकेट घेतल्या. एका कसोटी सामन्यात १०पेक्षा अधिक विकेट घेण्याची कामगिरी करण्याची ही त्यांची आठवी वेळ होती. असे करून त्याने अनिल कुंबळे यांच्या विक्रमाची बरोबरी केली. हरभजन सिंहने पाचवेळा १० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अश्विनने वेस्ट इंडिजच्या विरोधात एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी सहाव्यांदा केली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान कसोटी सामन्यात अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. याआधी हरभजनसिंहने पाचवेळा वेस्ट इंडिजविरोधात एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अश्विनने वेस्ट इंडिजचा माजी जलदगती गोलंदाज माल्कम मार्शल याला मागे टाकले.

हे ही वाचा:

अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा कोणताच खेळाडू मैदानात टिकू शकला नाही. सर्वांत जास्त २८ धावा एलिक नथनेज याने केल्या. जेसन होल्डरने नाबाद २० धावा केल्या. जोमेल वॉरिकन १८, अल्जारी जोसेफ १३ आणि जोशुआ डिसिल्वाने १३ धावा केल्या. रेमोन रिफरने ११ धावा केल्या. क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल सात-सात धावा करून बाद झाले.

Exit mobile version