27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषआशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण

आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण

टेनिस मिक्स्ड डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी

Google News Follow

Related

आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस या खेळात भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. टेनिसमधील हे पहिले सुवर्णपदक आहे. तर, यासह भारताच्या खात्यात आता नववे सुवर्णपदक जमा झाले आहे.

रोहन बोपन्ना आणि ऋतुराज भोसले यांनी टेनिस मिक्स्ड डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. बोपन्ना आणि ऋतुजाच्या जोडीने तैपेईच्या जोडीचा २ – ६, ६ – ३ आणि १० – ४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पहिला सेट २ – ६ असा गमावल्यानंतर, भारतीय संघाने यशस्वी पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला आणि सामना निर्णायक टायब्रेकरमध्ये नेला. १ तास आणि १४ मिनिटांच्या रोमहर्षक लढतीत, भारतीय जोडीने टायब्रेकरवर वर्चस्व राखले. शेवटी १० – ४ ने जिंकून सुवर्णपदक मिळवले.

बोपण्णाने आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याचे दुसरे पदक मिळवले, यापूर्वी जकार्ता २०१८ मध्ये त्याने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. दुसरीकडे, ऋतुजाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळवून स्मरणीय खेळ केला.

हे ही वाचा:

तब्बल सात तास गळ्यापर्यंत मातीत अडकले, बाकी कुणीच वाचले नाही…किल्लारी भूकंपाच्या विदारक आठवणी

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द

बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित

प्रीती पवार हिने बॉक्सिंगमध्ये शानदार कामगिरी केली आहे.  ५४ किलोच्या गटात प्रितीने उपांत्य फेरीत धडक मारत पदक निश्चित केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा