भारताने ढाका येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तिस-या स्थानासाठीच्या प्लेऑफ सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ ने असा पराभव करून भारतीय संघाने कांस्यपदकावर भारताचे नाव कोरले आहे. ही मोहीम भारतासाठी लक्षवेधी ठरली आहे.
भारताने शानदार आक्रमणाची सुरुवात केली होती. भारताने पहिल्याच मिनिटाला उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या सहाय्याने आघाडी घेतली. त्याआधी सुमित, वरुण कुमार आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पाकिस्तानचा पराभव केला. तर पाकिस्तानकडून अफराज, अब्दुल राणा आणि अहमद नदीम यांनी गोल केले.
राऊंड-रॉबिन टप्प्यात भारताने पाकिस्तानला ३-१ ने पराभूत केले होते. या स्पर्धेतील भारताचा पाकिस्तानवरील हा दुसरा विजय ठरला. भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगला संघासाठी गोल करता आला नसला तरीही, त्याच्या मिडफिल्डमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
हे ही वाचा:
माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी
विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने नकोच
‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले काय आणि नाही आले काय राज्याला फरक पडत नाही’
उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?
दमदार खेळाडू म्हणून भारतीय संघ स्पर्धेत उतरला. आणि राऊंड रॉबिन टप्प्यात अपराजित विक्रमासह अव्वल स्थान मिळविलेल्या भारतीयांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. मस्कत येथे झालेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानकडून भारताचा ३-५ असा पराभव झाला. बुधवारी उशिरा होणाऱ्या अंतिम लढतीत दक्षिण कोरियाचा सामना जपानशी होणार आहे.