पाकिस्तानवरील विजयानंतर मेलबर्न स्टेडियममध्ये अफजलखान वधाचा पोस्टर

भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या

पाकिस्तानवरील विजयानंतर मेलबर्न स्टेडियममध्ये अफजलखान वधाचा पोस्टर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल लागला आणि जगभरात त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रत्यक्ष मेलबर्न स्टेडियमवर काही भारतीय समर्थकांनी तर प्रचंड जल्लोष केला. तर तिकडे पाकिस्तानच्या छळाला कंटाळलेल्या बलुच नागरिकांनी भारताच्या या विजयाचा आनंद साजरा केला. काश्मीरमधील एका घरात किशोरवयीन मुलासाठी तर भारतीय संघाच्या विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मेलबर्न स्टेडियमवर अनेक भारतीयांना भारत पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्याचा आनंद घेतला. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात अखेरपर्यंत पारडे कधी पाकिस्तानच्या बाजूने तर कधी भारताच्या बाजूने अशी स्थिती होती, पण अखेर भारताने हा सामना जिंकून यशस्वी सलामी दिली. त्या विजयानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या भारतीयांनी नाचून आनंद व्यक्त केलाच पण पोस्टरही झळकावले. त्यात चक्क छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केल्याचे पोस्टरही झळकले. त्यावरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंदर सेहवागने एक व्हीडिओ शेअर केला. त्यात पाकिस्तानच्या झालेल्या पराभवामुळे एक चाहता प्रचंड नाराज झाला आणि त्याने चक्क टीव्हीवर हा राग काढला. टीव्हीवर एक जड वस्तू फेकून मारत स्क्रीनही फोडली आणि नंतर लाथेने टीव्ही खाली पाडला.

हे ही वाचा:

विराटच्या ऑस्ट्रेलियातील तुफान फटकेबाजीमुळे भारतात खरेदी थांबली

पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

या रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

 

काश्मीरमधील एक मुलगा तर अखेरच्या क्षणात प्रचंड उत्सुक झाला होता. एक धाव हवी असताना त्याने देवाचा धावा केला आणि अश्विनने भारताला जिंकून द्यावे अशी प्रार्थनाही त्याने केली. एक चेंडू आणि एक धाव हवी असताना या मुलाने अश्विन, अश्विन असे पुटपुटायला सुरुवात केली आणि ती धाव मिळाल्यावर तो मुलगा आतल्या खोलीत धावत सुटला.

Exit mobile version