भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

वर्ल्डकपमधील सलग तिसऱ्या विजयाची नोंद

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बहुचर्चित क्रिकेट सामन्यात भारताने दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर ७ विकेट्सनी मात केली. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने मोठ्या विजयाची नोंद केली. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताचा हा पाकिस्तानवरचा सलग आठवा विजय ठरला. या विजयासह भारताने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडच्या खात्यातही ६ गुण आहेत पण धावगतीच्या जोरावर भारत अव्वल ठरला आहे.

 

पाकिस्तानची कामगिरी मात्र अगदीच निराशाजनक झाली. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी घेऊन अवघ्या १९१ धावांवर गारद झाला. तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाला.त्यांचे आठ फलंदाज तर चक्क ३६ धावांत माघारी परतले. त्यांच्या या धावसंख्येला भारताने सहज मागे टाकले. कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर भारताने वर्ल्डकपमधील आपल्या सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

 

हे ही वाचा:

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने

कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करताना भारताने प्रारंभी झटपट फलंदाज गमावले होते. त्यामुळे यावेळी रोहित शर्मा तसा धोका पत्करू इच्छित नव्हता. पहिल्याच चेंडूवर त्याने शाहिन आफ्रिदीला स्क्वेअर लेगला चौकार मारत आपला इरादा स्पष्ट केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ६३ चेंडूंत शतकी खेळी केली होती.

 

शुभमन गिलला या सामन्यात संधी मिळाली मात्र त्याला १६ धावांचीच खेळी करता आली. शुभमन बाद झाला तरी रोहितने मात्र खेळपट्टीवर जम बसवला. सातव्या षटकात रोहितने आफ्रिदीला षटकार खेचला हा त्याचा सामन्यातील पहिला षटकार होता. शुभमन बाद झाल्यानंतर विराट कोहली (१६) मैदानात आला मात्र त्यालाही १६ धावांवरच पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. श्रेयस अय्यरने मात्र रोहितसह ७७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताचा विजय सहजसाध्य झाला. श्रेयसने ६२ चेंडूंत ५३ धावांची नाबाद खेळी केली.

Exit mobile version