सरकारकडून हरित ऊर्जा खरेदीला बळ

सरकारकडून हरित ऊर्जा खरेदीला बळ

भारताच्या केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने अपारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या वापराला बळ देण्यासाठी, या स्रोतांचा वापर करण्यासाठी उत्पादकांना सहकार्य देण्याचे ठरवले आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आयोजित एका परिसंवादात बोलताना मंत्रीमहोदयांनी ही माहिती दिली होती. या परिसंवादाचा मुख्य विषय ‘भारताच्या पुनर्वापरायोग्य ऊर्जा उत्पादनातील’ आत्मनिर्भरता हा होता. यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी भारत हा पुनर्वापरायोग्य ऊर्जा निर्मितीत जागतिक नेतृत्व करणारा देश बनला असल्याचे देखील सांगितले. त्याचबरोबर जगात सर्वात वेगाने या नव्या ऊर्जा स्रोतांचा वापर करणारा देश असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सिंग यांनी यावेळी हे देखील सांगितले की, पॅरिस करारांतर्गत सीओपी-२१ मध्ये भारताने २०३० पर्यंत ४० टक्के ऊर्जा निर्मिती अ-जिवाश्म इंधनांपासून निर्माण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यापैकी भारताने आत्ताच ३८.५ टक्क्यांचे लक्ष्य पूर्ण केले आहे आणि सध्या निर्माणाधीन असलेले प्रकल्प मोजले तर पूर्ण केलेले लक्ष्य ४८.५ टक्क्यांपर्यंत जाते.

हे ही वाचा:

वेबसाईट हँग; दहावीची मुले त्रासली

अनिल देशमुखांना ईडीचा दणका

शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब

काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्वच नको

भारत येणाऱ्या काळात देखील पुनर्वापरायोग्य ऊर्जा निर्मितीत जागतिक नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त केला. भारताने २०३ पर्यंत ४५० गिगावॅट ऊर्जा निर्मिती या प्रकारच्या इंधनांतून करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भारत लवकर हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया यांच्या क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून पुढे येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच त्यांनी हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना नैसर्गिक वायूतून काढल्या जाणाऱ्या हायड्रोजन ऐवजी हरित हायड्रोजनचा वापर करण्याची विनंती केली गेली असल्याची माहिती देखील दिली. त्यासाठी सरकार लवकरच आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सरकारच्या धोरणामुळे देशांतर्गत हायड्रोजन आणि सोलर पॅनल उत्पादनाला देखील चालना मिळणार आहे.

सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार यासाठी लवकरच आवश्यक ती नियमावली व इतर सुविधा देखील पुरवणार आहे. त्याबरोबरच सरकारकडून हरित ऊर्जा खरेदीसाठी प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे. त्याबरोबरच या ऊर्जेच्या किंमतीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Exit mobile version