वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले तरी आता पुन्हा इंग्लंडला हरवण्याची संधी भारताला मिळणार आहे. भारत लवकरच इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रलिया आणि भारत हे दोनच संघ असे आहेत की, जे इंग्लंडविरोधात मायदेशात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी पाच कसोटी सामने खेळतात. इंग्लंडचा संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येईल. तेव्हा दोघांमध्ये एंथनी डिमेलो ट्रॉफी अंतर्गत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इंग्लंडने जिंकल्यानंतर इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी नव्या मालिकेची घोषणा केली. या दरम्यान त्यांनी सन २०२५-२०३१ या सात वर्षांचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक घोषित केले. त्याअंतर्गत भारतीय संघ सन २०२५मध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहे.
इंग्लंड आणि भारतादरम्यानचे सर्व कसोटी सामने लॉर्ड्स, ओव्हल, वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा हेडिंग्ले, एजबेस्टन आणि ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळले जातील ‘या वेळापत्रकानुसार, आता या स्टेडियमच्या व्यवस्थापकांना त्यांच्या स्टेडियममध्ये सुधारणा करण्यास पुरेसा अवधीही मिळेल आणि प्रेक्षकांना क्रिकेटची चांगली मजा घेता येईल, यानुसार ते सुविधाही अद्यवात करतील,’ अशी आशा ईसीबीचे सीईओ रिचर्ड गोल्ड यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
बिपरजॉय गुजरातला धडकणार! प्रशासन अलर्ट मोड वर
… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग
‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम
न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ जून २०२५मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल. ईसीबीने सांगितले की, पतौडी ट्रॉफीचे हे सामने लॉर्ड्स, द ओव्हल (दोन्ही लंडन), एजबेस्टन (बर्मिंगहम), हेडिंग्ले (लीड्स) आणि ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)मध्ये खेळले जातील.