वर्षभरात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंडशी मायदेशात भारतीय संघ करणार दोन हात

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होणार सप्टेंबरमध्ये

वर्षभरात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंडशी मायदेशात भारतीय संघ करणार दोन हात

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ अर्थात बीसीसीआयने मंगळवारी सन २०२३-२४मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकूण १६ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कार्यक्रम जाहीर केला. भारताचा संघ एकूण पाच कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि आठ टी-२० सामने खेळेल. हा संपूर्ण कार्यक्रम पुढील वर्षीच्या मार्चपर्यंतचा आहे. यामध्ये भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धा २०२३चा समावेश नाही.

 

विश्चचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामने होतील. ही मालिका २२ सप्टेंबरपासून मोहाली येथे सुरू होईल. दुसरा सामना २४ सप्टेंबर रोजी इंदोर येथे तर, तिसरा सामना २७ सप्टेंबरला राजकोट येथे खेळवला जाईल. दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळेल.

 

हे ही वाचा:

निधीवाटपात कुणावरही अन्याय झालेला नाही!

अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!

लोकायुक्त पोलिसांना पाहून लाच खाणाऱ्याने पैसे ‘खाल्ले’

भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार !

पहिला टी-२० सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होईल. तर, दुसरा सामना २६ नोव्हेंबर रोजी थिरुवनंतपरूम येथे, तिसरा सामना २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे, चौथा १ डिसेंबर रोजी नागपूरला तर, पाचवा आणि अखेरचा सामना ३ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे रंगेल.

 

ऑस्ट्रेलियानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२०चे तीन सामने खेळवले जातील. पहिला सामना ११ जानेवारी रोजी (मोहाली), दुसरा सामना १४ जानेवारी (इंदोर) आणि तिसरा सामना १७ जानेवारी (बंगळुरू) रोजी होईल. भारत आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जातील. पहिला सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरू होईल. तर, दुसरा सामना २ फेब्रुवारी (विशाखापट्टणम), तिसरा सामना १५ फेब्रुवारी (राजकोट)पासून सुरू होईल. तर, चौथा सामना २३ फेब्रुवारी (रांची) आणि पाचवा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होईल.

Exit mobile version