हे बलिदान कधीही विसरता येणार नाही

हे बलिदान कधीही विसरता येणार नाही

“मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आज हुतात्मा झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे.” असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि हुतात्मा झालेल्या श्रद्धांजली अर्पण केली.

मणिपूरमध्ये शनिवारी (१३ नोव्हेंबर) सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात एक ऑफिसर, चार  जावन आणि ऑफिसर यांची पत्नी आणि मुलगा ठार झाले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे. ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा आणि चार सैनिक देखील या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे.

याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा:

…तर पद्मशी परत करेन आणि जाहीर माफीही मागेन

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार

२०१५ मध्ये मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते, त्यानंतर लष्कराने त्यांच्या कॅम्पवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. मणिपूरमध्ये ईशान्येकडील काही राज्यांप्रमाणे अनेक सशस्त्र गट आहेत. त्यामुळे चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतानच्या सीमा असलेल्या भागात अनेक दशकांपासून लष्कर तैनात आहे.

Exit mobile version