भारतात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. लसीकरण हा प्रभावी मार्ग असल्याने भारताने लसीकरण देखील वेगाने करायला सुरूवात केली आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने देशाच्या बाहेरही लस उत्पादन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भारताला लसींची कमतरता भासणार नाही.
लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट देशाच्या बाहेरही उत्पादन करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे. भारताच्या लसीकरणाची मदार ज्या दोन लसींवर आहे, त्यांपैकी कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सिरम करत आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्युट करत आहे. आता हीच लस देशाबाहेरही उत्पादित करण्याचा विचार सिरम करत आहे. येत्या काही दिवसात याबाबतची घोषणा केली जाणार असल्याचे आदर पूनावाला यांनी नमूद केले आहे.
हे ही वाचा:
भारतात आज दाखल होणार स्पुतनिक लस
पण काही बाटगे मात्र विदेशी राज्यकर्त्यांसमोर मुजरा करीत राहिले
भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा
महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सिरम इन्स्टिट्युट जुलै महिन्यापर्यंत मासिक लसीचे उत्पादन वाढवून १०० दशलक्ष डोसेस पर्यंत नेणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ही मर्यादा मे महिन्यापर्यंत सांगण्यात आली होती. लवकरच सिरम आपले उत्पदान वर्षाला २.५ ते ३ अब्ज डोसेस पर्यंत करणार असल्याचे देखील आदर पूनावाला यांनी सांगितले आहे.
भारत सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. लसीकरणाचा परिघ वाढवण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण केले जाणार आहे.