भारतातील मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरूवात होणार आहे. या काळातील देशातील मान्सून सरासरीइतका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळातील मान्सून भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा ठरेल असे भाकित करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब, दिल्ली आणि हरियाणाचा काही भाग वगळता, इतर सर्व भागांसाठी पुढील टप्प्यातील मान्सून हा अधिक दिलासादायक ठरणार आहे. कोविडमुळे आधीच नुकसानीत असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उत्तम मान्सून आवश्यक आहे.
दुसऱ्या टप्प्यात सामान्य पाऊस झाल्यास त्याचा फायदा खरिप पिकांना होणार आहे. जून महिन्यातील पावसातील अनियमिततेमुळे यंदाची पेरणी कमी झाली होती. त्यामुळे पाऊस सामान्य झाल्यास खरिपाच्या पेरणीला पुन्हा एकदा उभारी मिळून एकूण पेरणीखालील क्षेत्र देखील वाढेल.
हे ही वाचा:
सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय
सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?
सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा
‘या’ देशात झाला मोठा दहशतवादी हल्ला
समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमानाचा पर्जन्यमानावर परिणाम होत असल्याने दोन्ही महासागरांच्या तापमानावर भारतीय हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन महिन्यात सुमारे ९५ ते १०५ टक्के पावसाची शक्यता आहे. आत्तापर्यंत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी ४२८.३mm इतकी राहिली आहे. मासिक सरासरीपैकी ऑगस्ट महिन्यात ९४ ते १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.