जगाची गरज ओळखून शैक्षणिक व्यवस्था आपल्या दरवाज्यापर्यंत आली आहे. जगाच्या या स्पर्धेत विद्यार्थी करियरमध्ये उत्तमरित्या उत्तीर्ण झालात तर दहा वर्षांनी परिश्रम, गुणवत्तेमुळे भारत हा जगात मनुष्यबळ पुरवण्यात विश्वगुरू बनेल, असा आशावाद मुंबई भाजपाचे अध्यक्ष-आमदार ॲड.आशिष शेलार यांनी काल मुलुंड पश्चिम येथे बोलताना व्यक्त केला.
मुलुंड सेवा संघ आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) येथे “२६ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वतःची आवड, परिस्थितीनुसार जगात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि रिसर्च या पद्धतीने अभ्यासक्रमाची सोय आम्हाला नव्हती. आवडीच्या विषय निवडीची सोय नवीन शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झाली आहे. जगात पावलोपावली असलेल्या स्पर्धेबरोबर जिंकण्याची व्यवस्था सुद्धा सर्व गोष्टी मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मोदी सरकारने केल्या आहेत. आता गंगा उलटी वाहत आहे. शैक्षणिक धोरणात केलेल्या या योजनांमुळे जगातील नामांकित विद्यापीठे आपल्या घरापर्यंत येत आहेत. विद्यापिठे स्थापन करण्यासाठी आता भारताकडे अर्ज करत आहेत. असे शेलार म्हणाले.
हे ही वाचा:
रमिता जिंदालची चमकदार कामगिरी, १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत प्रवेश !
नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास, कांस्य पदकावर कोरले नाव !
सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!
शिळफाटा अत्याचार, हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा !
यावेळी आयोजक व मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. मुलुंडमधील विविध शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ५००विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विवेक साप्ताहिक संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक रमेश पतंगे, समाजसेवक बिरजू मुंदडा, अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष चेतन देडीया, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, मुलुंड विधानसभा भाजपा अध्यक्ष मनीष तिवारी, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे आणि मुलुंड सेवा संघाचे सचिव विनायक सुतार आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिलिका संस्थेच्या कविता रेडकर यांनी करियर मार्गदर्शन केले. तर शैक्षणिक कर्जांबाबत निघोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.