जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानी सैन्य टीआरएफला पाठिंबा देत आहे. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा एजन्सीकडून तपासणी सुरु आहे. याच दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद कसुरी घाबरला असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी सैफुल्लाह कसुरीने एक व्हिडीओ जारी करत त्याने हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे.
दहशतवादी सैफुल्लाह कसुरी व्हिडीओमध्ये म्हणतो, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला, हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्याच्या बहाण्याने भारतीय माध्यमांनी मला आरोपी बनवले आहे आणि पाकिस्तानवर दोषारोप केला आहे, हे अत्यंत खेदजनक आहे.
तो पुढे म्हणाला, ‘भारताने सिंधू पाणी करार पुढे ढकलला आहे. भारताला पाकिस्तानचे पाणी थांबवायचे आहे, पाकिस्तानला नष्ट करायचे आहे. यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्याने भारताविरुद्ध विष ओकले आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या उपस्थितीबद्दल विधान केले.
विशेष म्हणजे, दहशतवाद्याने आपल्या निवेदनात जगाला भारताच्या रोषापासून वाचवण्याचे आवाहनही केले. म्हणाला, ‘आम्ही जगाला आवाहन करतो की डोळे बंद करून भारताला पाठिंबा देण्याऐवजी सत्याचे समर्थन करावे. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याला भारताचे षड्यंत्र असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की त्याचा पाकिस्तानशी किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाशी काहीही संबंध नाही.
हे ही वाचा :
पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!
पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर जाईल
सिंधू जल कराराचे स्थगन योग्य दिशेने उचललेले पाऊल
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट भारतात रिलीज होणार नाही
दरम्यान, सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा एक वरिष्ठ आणि विश्वासू फील्ड कमांडर मानला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह लष्करचा संस्थापक हाफिज सईदच्या संरक्षणाखाली काम करतो. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून कार्यरत असलेला हा दहशतवादी गेल्या अनेक वर्षांपासून खोऱ्यात दहशत पसरवण्याच्या कटाचा सूत्रधार आहे.
याआधीच्या व्हिडीओ मध्ये त्याने भडकाऊ भाषण केले होते. खैबर पख्तूनख्वा येथील एका रॅलीत बोलताना तो म्हणतो, “आज २ फेब्रुवारी आहे आणि आज मी वचन देतो की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपण काश्मीर काबीज करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.”
येत्या काळात आमचे मुजाहिदीन काश्मीरमध्ये हल्ले तीव्र करतील. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर स्वतंत्र होईल अशी आशा असल्याचे सैफुल्लाह कसुरीने म्हटले होते. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने दहशतवादी उघडपणे उपस्थित होते.
🚨🚨🚨 Breaking:
With tears in eyes Lashkar-E-Tayyaba Dpty Chief Saifullah Kasuri denies any role in the Pahalgam attack and cautions the world not to back India.#Pahalgam #PahalgamTerroristAttack #SaifullahKasuri pic.twitter.com/8NERiBvANh
— Navpravah (@navpravahlive) April 23, 2025