भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?

भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?

आजपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होता आहे. एकदिवसीय मालिकेत ३-० असा वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवल्यानंतर टी-२० मालिकेवरही आपले नाव करायच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल. कोलकाता येथील ईडन गार्डन्स या मैदानावर ही मालिका खेळली जाणार आहे.

एकूण तीन सामन्यांची ही मालिका असून त्यातील पहिला सामना आज संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. तर यानंतर पुढील दोन सामने हे शुक्रवार, १८ फेब्रुवारी आणि रविवार, २० फेब्रुवारी या दिवशी खेळला जाणार आहे.

हे ही वाचा:

शिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

या टी-२० मालिकेची सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला जोरदार झटका बसला आहे. भारताचा उपकर्णधार लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हे दोघेही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत तर त्यांच्या जागी सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू खेळाडू दीपक हूडा यांना संघात स्थान मिळाले आहे. तर यष्टीरक्षक ऋषभ पंत याला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भारतीय संघ या मालिकेची जोरदार तयारी करत असून गेल्या दोन दिवसांच्या भारतीय संघाच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच बदल होताना दिसत आहेत. वेस्ट इंडिजचा संघ हा टी ट्वेन्टी क्रिकेट प्रकारातील एक दादा संघ मानला जातो. तर याच वर्षी टी-२० विश्वचषकही होऊ घातला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

Exit mobile version