भारताचे मिशन श्रीलंका आजपासून सुरु

भारताचे मिशन श्रीलंका आजपासून सुरु

आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये टी२० आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यापैकी टी२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडीयम येथे हा सामना खेळला जाणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धची टी२० मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. श्रीलंकेचा संघ तुलनेने कमकुवत समजला जात असला तरीही त्यांना हलक्यात घेऊ शकत नाही. नुकतेच श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलियन संघाला टी२० सामन्यात धूळ चारली आहे. तर अवघ्या काही महिन्यांवर टी२० विश्वचषक येऊन ठेपला आहे. ऑस्ट्रेलियात होऊ घातलेल्या या विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेकडे गांभीर्यानेच बघत आहे.

श्रीलंके विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव हे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे ते दोघेही संघातून बाहेर पडले आहेत. तर रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन होत आहे. तर संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळाले आहे.

७ वाजता सामन्याला सुरुवात होणार असून नाणेफेक पार पडली आहे. श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाची प्रथम फलंदाजी असणार आहे.

Exit mobile version