भारत आणि पाकिस्तान आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा आज आमनेसामने येणार आहेत. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार असून, भारतीय संघ पुन्हा एकदा बाजी मारण्यास उत्सुक आहे.
गेल्या रविवारीच भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. त्या सामन्यात भारताने पाच विकेटनी बाजी मारली होती. आता आशिया कप स्पर्धेच्या ‘सुपर फोर’मध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. भारतीय संघ बाजी मारण्याचे सातत्य राखण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. आजच्या लढतीत भारतीय संघाला चांगली कामगिरी करावी लागणार असून, भारताला वेगवान गोलंदाजांना आपली भूमिका चोखपणे पार पाडावी लागणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाला रवींद्र जाडेजाची उणीव जाणवणार आहे. कारण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी संघात अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी डावखुऱ्या जाडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते.
हे ही वाचा:
मुसळधार पावसामुळे मुंबईत भाविकांची उडाली त्रेधा
भारतीय अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर
म्हणून बायबल हाती धरण्यास दादाभाई नौरोजींनी दिला होता नकार
सिनेमांच्या पात्रात श्रीगणेश, मनाला पटते का?
‘सुपर फोर’मध्ये पोहचण्यासाठी सर्व संघाना किमान तीन सामने खेळावे लागणार आहेत. जर भारत-पाकिस्तान अव्वल दोन संघ बनले तर क्रिकेट जगताला आणखी एक चुरशीचा सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.