विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानशी भिडणार, पावसाच्या खेळीवर असणार लक्ष

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाच्या थराराला सुरुवात झाली असून आज भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली कट्टर प्रतिस्पर्धक पाकिस्तानशी भिडणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानशी भिडणार, पावसाच्या खेळीवर असणार लक्ष

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाच्या थराराला सुरुवात झाली असून आज भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली कट्टर प्रतिस्पर्धक पाकिस्तानशी भिडणार आहे. त्यामुळे दिवाळी निमित्त क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा रविवार हा खास असणार आहे. तर पाकिस्तानला नमवून भारतीयांना दिवाळीचं गोड गिफ्ट देण्यासाठी भारतीय संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहे. मागील काही मालिकांमधील पाकिस्तानचा खेळ पाहता आजचा सामना नक्कीच अटीतटीचा ठरणार आहे.

गतवेळच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. कोणत्याही प्रकारच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकने भारताला पराभूत केले नव्हते. मात्र, गतवेळेस दुबईत ही परंपरा खंडित झाली होती.

स्पर्धेच्या पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय २०१३ नंतर आयसीसी स्पर्धांचे कोणतेही विजेतेपद भारतीय संघाने पटकावलेले नाही याची जाणीव असल्याचे तो म्हणाला. मात्र, त्याचे दडपण नसून आव्हान असल्याचे रोहित शर्मा म्हणाला. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी भारतीय संघाने केलेली आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

हे ही वाचा:

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

पावसाच्या खेळीवर असेल लक्ष

या महामुकाबल्यादरम्यान पावसाच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मागील तीन- चार दिवसांपासून मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Accuweather च्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांपासून येथे पाऊस पडला नाही. पण ऑस्ट्रेलियात सध्या वातावरण ढगाळ असून दुपारी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. आज मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता ४० टक्के असून वाऱ्यांचा वेगही ४५ किमी/ताशी इतका असेल.

सामना केव्हा आणि कुठे येणार पाहता

आजचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर तर लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Exit mobile version