एशियन गेम्समध्ये भारताने आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.भारताच्या पुरुष हॉकी संघाने अव्वल कामगिरी करत जपानचा ५-० ने धुव्वा उडवत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
एशियन गेम्समध्ये भारताने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. गेल्या ७२ वर्षातील पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. फायनल मॅचमध्ये भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास यांनी गोल केले. फायनलमध्ये भारताने जपानवर ५-१ असा विजय मिळवत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. या विजयासह हॉकी संघाने २०२४ साली होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी प्रवेश मिळवला आहे. तर भारताच्या पदकांची संख्या ९५ वर पोहोचली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
भारताने पहिल्या सत्रापासूनच जापानवर आघाडी मिळवली होती.विशेष म्हणजे भारतीय हॉकी संघ या एशियन गेम्समध्ये एकही सामना हारलेला नाही. बांगलादेश ते पाकिस्तान या सारख्या दिग्गज संघांना मोठ्या फरकाने पराभूत केलं.
भारताकडून पहिला गोल मनप्रीत सिंह याने मारला. पण जापानने रिव्ह्यू घेतल्याने निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. पण तिसऱ्या पंचांनी गोल असल्याचं सांगितलं आणि टीम इंडियाने पहिली आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिलंच नाही. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातही आघाडी कायम ठेवली. या कामगिरीसह टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे.
भारताकडून मनप्रीत सिहं, कर्णदार हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास आणि अभिषेक यांनी गोल मारला. यासह भारताने ऑलिंपिक २०२४ मधील कोटाही पूर्ण केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्स इतिहासातील चौथं गोल्ड मेडल पटकावलं आहे.याआधी भारताने १९६६, १९९८, २०१४ साली सुवर्ण जिंकले होते.