भारतात क्रिकेट हा धर्म आहे. पुरुषांचे क्रिकेट तर लोकप्रिय आहेच पण महिलांचे क्रिकेटही आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यासाठी डी.वाय. पाटील स्टेडियम खचाखच भरले होते. तब्बल ४७ हजार प्रेक्षकांनी स्टेडियमचा ताबा घेतला होता.
या टी -२९आय मालिकेतील पहिल्या सामन्यालाही जवळपास ३० हजार चाहते आले होते. भारतात २०१३ च्या महिला विश्वचषकापासून ही चाहत्यांची मोठी वाढ आहे. आणि दुसऱ्या सामन्यात चक्क ४७ हजार चाहत्यांनी डी वाय पाटील स्टेडियम मध्ये गर्दी केली. म्हणजे आता हे म्हणायला काही हरकत नाही की महिला क्रिकेट आता लोक प्रसिद्ध होत आहे.
हे ही वाचा :
अजबचं! कोण आधी फोटो काढणार? प्रश्नावरून लग्न मंडपात हाणामारी
पदयात्रेला ब्रेक देऊन राहुल गांधी परदेश यात्रेला जाणार?
नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक
पेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले ‘ओलीस’
महिला क्रिकेट खेळांसाठी आधी गर्दीचे प्रमाण खूप कमी होते. गर्दी नसल्याने क्रिकेटचे सामने मुंबईतील बीकेसीमधील एमआयजी सीसी, एमसीए मैदान आणि कटकमधील ड्रिम्स क्रिकेट स्टेडियम मध्ये व्हायचे. पहिला महिला क्रिकेटचे चाहते नसल्याने अश्या कमी गर्दीची सोय असलेल्या ठिकाणी सामने व्हायचे. पण तोच आकडा खूप वाढल्याचे दिसत आहे. मागील दोन सामन्यात अफाट गर्दीच्या उपस्तीथी ने आता हा प्रश्न पडला आहे की ‘आता किती चाहते येतील?’ या विक्रमामुळे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला ब्रेबॉर्न स्टेडियमवर मालिकेतील शेवटचे तीन सामने आयोजित करण्यास भाग पाडले आहे, जेणेकरून गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित होईल. “आम्ही या सामन्यांसाठी गर्दीची व्यवस्था करण्यासाठी घाई करत आहोत. सुरुवातीला आम्हाला बीसीसीआयने सांगितले होते की या ठिकाणी १ हजार ते २ हजार चाहते असतील, परंतु आता आम्हाला अचानक सांगितले जात आहे की आता परिस्थिती वेगळी आहे,” एका विश्वसनीय सीसीआय अधिकाऱ्यानी सांगितले.