हुश्श…अखेरची कसोटी आजपासूनच खेळली जाणार

हुश्श…अखेरची कसोटी आजपासूनच खेळली जाणार

शुक्रवार, १० सप्टेंबर पासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा सुरु होणार आहे. कालपर्यंत या कसोटी सामन्यावर संकटाचे ढग डाटले होते. हा सामना खेळला जाणार, पुढे ढकलला जाणार की रद्द केला जाणार? यावर चर्चा सुरू होती. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाचे फिजिओ असलेले योगेश परमार हे कोविड पॉझिटिव्ह आढळले. म्हणूनच या सामन्यावर संकट ओढवल्यासारखे वाटत होते. कारण परमार हे कोविड पॉझिटिव येण्याआधी सतत भारतीय संघातील खेळाडूंच्या संपर्कात होते.

त्यामुळे भारतीय खेळाडूंचीही कोविड चाचणी करण्यात आली. पण या चाचणीत सर्व खेळाडू हे कोविड निगेटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळेच भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतला अखेरचा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसारच खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील चौथी कसोटी सुरू असताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा ते आणि त्यांच्यासोबत इतर सपोर्टिंग स्टाफ हे विलगीकरणात गेले होते. तरीही भारतीय संघाचे प्रशिक्षण सुरू होते. अशातच गुरुवारी योगेश परमार हे देखील पॉझिटिव आल्याचे समोर आले. त्यामुळे या मालिकेबाबत सर्वांना चिंता वाटत होती. पण भारतीय खेळाडूंची चाचणी निगेटीव्ह आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

हे ही वाचा:

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’

बायकोच्या त्रासामुळे त्याचे २० किलो वजन घटले!

प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत आतापर्यंत चार सामने पूर्ण झाले आहेत. भारत २-१ अशाप्रकारे मालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. यावरूनच भारत ही मालिका जिंकणार की मालिका अनिर्णित राहणार हे निश्चित होईल.

Exit mobile version