आगामी शैक्षणिक वर्षात भारतात २१ नवी सैनिकी विद्यालये सुरु होणार आहेत. २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षात या सैनिकी शाळा सुरु होणार आहेत. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने या नव्या शाळांच्या प्रस्तावाला परवानगी दिली आहे. या शाळा भागीदारीच्या तत्वावर सुरु करण्यात येणार आहेत. स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, राज्य सरकारे यांच्यासोबत भागीदारी करुन या शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
या शैक्षणिक वर्षात, २१ नव्या सैनिकी शाळा सुरु करण्यास, संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारच्या देशभरात, भागीदारीच्या तत्वावर १०० शाळा सुरु करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून या शाळा स्थापन केल्या जाणार आहेत. या शाळा सध्या असलेल्या सैनिकी शाळांपेक्षा वेगळ्या असतील. सध्या अस्तित्वात असलेल्या सैनिकी शाळा, पूर्णपणे निवासी शाळा आहेत. मात्र, या नव्या २१ शाळांपैकी ७ शाळा दिवसभराच्या असतील तर १४ शाळा निवासी शाळा असतील.
हे ही वाचा:
पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार
‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’
मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!
ढोंग, लबाडीची ‘केजरीवाल फाइल्स’
या नव्या शाळा, त्यांच्या संबंधित शैक्षणिक बोर्डाशी संलग्न असतील, त्याशिवाय, त्या सैनिक स्कूल सोसायटीच्या अधीन राहून काम करतील. या सोसायटीने भागीदारीतल्या सैनिकी शाळांसाठी निश्चित केलेल्या नियम-कायद्यांच्या अनुसार त्यांचे कार्यान्वयन चालेल. या शाळेची कार्यपद्धती आणि इतर माहिती www.sainikschool.ncog.gov.in. वर उपलब्ध आहे.
या सैनिकी शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असणार आहे.
(A) या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सहाव्या इयत्तेपासून सुरु होणार असून, त्यासाठी खालील नियम असतील:-
१) एनटीए ने ई-कौन्सिलिंग च्या माध्यमातून घेतलेल्या प्रवेश परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहाव्या वर्गात ४० टक्के जागा असतील.
२) त्याच शाळेत आधी शिकत असलेल्या आणि आता सैनिकी शाळेत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ६० टक्क्यांपर्यंतच्या जागा ठेवल्या जातील. मात्र, त्यांनाही एक पात्रता चाचणी द्यावी लागेल, ज्यासाठीची वेगळी अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.
(B) अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२२ साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्याविषयी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर एनटीए कडून कळवले जाईल. यात. नव्याने मंजूर झालेल्या सैनिकी शाळा केव्हा सुरु होतील आणि शाळेत अर्ज करण्याची प्रक्रिया याविषयी माहिती दिली जाईल. जे पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्यास उत्सुक असतील, त्यांना ई-कौन्सिलिंग साठी www.sainikschool.ncog.gov.in. इथे नोंदणी करावी लागेल.
(C) ज्या विद्यार्थ्यांनी नव्या सैनिकी शाळांमध्ये आधीच नोंदणी केली असेल आणि त्यांना पुढेही याच शाळेत, सैनिकी विभागात काम करण्याची इच्छा असेल, त्यांना लवकरच होणाऱ्या पात्रता परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिले जातील. नव्या सैनिकी शाळांना अशा इच्छुक विद्यार्थ्यांची वेगळी यादी निश्चित वेळेत पात्रता चाचणी घेणाऱ्या संस्थेला पाठवण्याची सूचना या सैनिकी शाळांना देण्यात आली आही याविषयीची सविस्तर माहिती देखील, www.sainikschool.ncog.gov.in. या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.
मान्यता मिळालेल्या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया मे २०२२ पासून सुरु होण्याची शक्यता आहे. याविषयीचे वेळापत्रक www.sainikschool.ncog.gov.in. या वेब पोर्टलवर बघता येईल.
दुसऱ्या फेरीत उर्वरित सैनिकी शाळांसाठी इच्छुक असल्याचे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.