देशात लवकरच तयार होणार दिवसाला ३ लाख रेमडेसिवीर

देशात लवकरच तयार होणार दिवसाला ३ लाख रेमडेसिवीर

कोविडच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या देशातील उत्पादनात आता वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत या संबंधीची माहिती दिली. देशातील रेमडेसिवीर उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत.

देशात सध्या कोविडची दुसरी लाट सुरु आहे. सारा देश या लाटेत होरपळून निघत आहे. कुठे बेड्स मिळत नाहीयेत, कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे तर कुठे व्हेंटिलेटर नाहीयेत. कोविडच्या उपचारात अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीरची मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी. अशा परिस्थितीत या इंजेक्शनचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या सगळ्याच गोष्टीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणुन केंद्र सरकारकडून निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे रेमडेसिवीरच्या निर्यातीवर भारत सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे तर इंजेक्शनच्या किंमतीतही घट करण्यात आली आहे. दुसरीकडे रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

हे ही वाचा:

सुनील मानेच होता, मनसुखला फोन करणारा तावडे

भारताने गाठला लसीकरणात महत्त्वाचा टप्पा

इथे मिळेल ‘ई- पास’

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

केंद्र सरकारच्या याच प्रयत्नांमुळे आता रेमडेसिवीर उत्पादनाच्या बाबतीत लवकरच भारत मोठी झेप घेणार आहे. भारतात काहीच दिवसात आता दिवसाला तीन लाख रेमडेसिवीर निर्माण होणार आहे. केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. १२ एप्रिल पासून २५ नव्या रेमडेसिवीर उत्पादनाच्या साईट्सना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता भारताची रेमडेसिवीर उत्पादनाची क्षमता ही दिवसाला ९० लाख इंजेक्शन किंवा त्यापेक्षा अधिकची झाली आहे. यापूर्वी ती क्षमता ४० लाख इतकी होती. त्यामुळे आता लवकरच देशात दिवसाला ३ लाख रेमडेसिवीर तयार केले जातील असे मांडवीया यांनी सांगितले.

Exit mobile version