भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या कसोटी मालिका रंगली आहे. ही मालिका फारच रोमहर्षक आणि अटीतटीची होताना दिसत आहे. तर या मालिकेमुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना उत्तम दर्जाच्या कसोटी क्रिकेटचा आनंद लुटता येत आहे. अशातच बुधवार, ८ सप्टेंबर रोजी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या एक दिवसीय आणि टी-२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पण हे वेळापत्रक या वर्षीचे नसून २०२२ सालचे आहे. २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी ते इंग्लंड सोबत एक दिवसीय मालिका आणि टी-२० मालिका खेळणार आहेत. तीन एक दिवसीय मालिका आणि तीन टी-२० मालिका असे हे वेळापत्रक आहे.

हे ही वाचा:

‘इंडियन आयडल फेम’ सायली का आहे आशाताईंची भक्त

शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार

सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

सुरुवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका खेळली जाईल. ही मालिका १ जुलै ते ६ जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. तर त्यानंतर ९ जुलै पासून एक दिवसीय सामन्यांना सुरुवात होईल ते १४ जुलैपर्यंत चालतील.

या मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे
१) पहिला टी-२० सामना १ जुलै २०२२, मॅचेंस्टर
२) दुसरा टी-२० सामना ३ जुलै २०२२, नॉटिंगघम
३) तिसरा टी-२० सामना ६ जुलै २०२२, साऊदम्प्टन
४) पहिला एक दिवसीय सामना, ९ जुलै २०२२, बर्मिंघम
५) दुसरा एक दिवसीय सामना, १२ जुलै २०२२, ओव्हल
६) तिसरा एक दिवसीय सामना, १४ जुलै २०२२, लॉर्ड्स, लंडन

Exit mobile version