ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?

ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने आपल्या नावावर करत भारताने आधीच मालिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आजचा हा अखेरचा सामना जिंकत भारतीय संघ न्यूझीलंडला चारी मुंड्या चीत करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

रविवार, २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स या मैदानात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या चालू टी२० मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतलेल्या भारतीय संघासमोर ३-० अशा फरकाने मालिका विजयाची ही संधी असणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ आजच्या सामन्यात विजयी होऊन मालिकेत एक सामना तरी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.

हे ही वाचा:

हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट

देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आणि टीम साऊदीच्या नेतृत्वात खेळणारा न्यूझीलंड संघ या दोन्ही मध्ये अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचादेखील समावेश आहे. तर अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी दिली गेली आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेल याने पदार्पण करत प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे या सामन्यात अंतिम ११ खेळाडू कोण असणार हे बघणे म्हजत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version