न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात आज दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. रांची येथे हा सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका विजयाची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघापुढे असणार आहे.
शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी रांची येथील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या चालू टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतलेल्या भारतीय संघासमोर मालिका विजयाची ही संधी असणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ आजच्या सामन्यात विजयी होऊन मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल.
हे ही वाचा:
बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही
भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन
मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आणि टीम साऊदीच्या नेतृत्वात खेळणारा न्यूझीलंड संघ या दोन्ही मध्ये अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचादेखील समावेश आहे. तर अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी दिली गेली आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर आजच्या सामन्यात पहिल्या सामन्यातील काही खेळाडूंना वगळून नव्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. युवा खेळाडूंना अनुभव देण्याच्या दृष्टीने हे केले जाण्याची शक्यता आहे. भारत ही मालिका जिंकला तर मुख्य प्रशिक्षक पदी नव्याने नियुक्ती झालेल्या राहुल द्रविड यांच्यासाठी ही यशस्वी सुरुवात ठरू शकेल.