भारत सरकारचे नवे हवाई उड्डाण प्रशिक्षण केंद्र आता महाराष्ट्रातील जळगाव येथे होऊ घातले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण संघटना धोरणाच्या अंतर्गत हे प्रशिक्षण केंद्र तयार केले जाणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत भारतात नवी ८ हवाई उड्डाण प्रशिक्षण केंद्रे होऊ घातली आहेत. जळगाव, बेळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लीलाबारी या पाच ठिकाणी मिळून ही प्रशिक्षण केंद्रे सुरु होणार आहेत.
विमानउड्डाण प्रशिक्षणाच्या बाबतीतही भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. भारताला जागतिक पातळीवरील विमानोड्डाण प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी उड्डाण प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी भारतात आठ नव्या पारशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. तसेच भारताच्या शेजारी देशांतील विद्यार्थ्यांच्या हवाई उड्डाण प्रशिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने देखील या केंद्रांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या देशातील विद्यार्थीही भारतात येऊन विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेऊ शकतात.
हे ही वाचा:
मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत अद्याप अनिश्चितता दुर्दैवी – भाजपा
‘तुझ्या बापाला’…किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली
ट्विट डिलिट केले तरी महापौरांची असभ्य अक्षरं कोरली गेली आहेत
ह्या आठ प्रशिक्षण केंद्रांसाठी स्थान निवडताना सर्व बाबींचा विचार करून सरकारने पाच जागांची निश्चिती केली आहे. हवामानविषयक समस्या उद्भवण्याचे आणि नागरी तसेच लष्करी हवाई वाहतुकीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रशिक्षण केंद्रांसाठी अत्यंत काळजीपूर्वकरित्या या पाच विमानतळांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील जळगावची निवड झाली आहे.