भारताने अमेरिकेकडून तीस ड्रोन विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. भारत समुद्र सीमांवर आणि जमिनीवरील सीमांवरही नजर ठेवण्यासाठी या विमानांचा वापर करणार आहे. या तीस विमानांची किंमत ही $३ अब्ज असणार आहे.
ड्रोन ही अद्ययावत विमाने असून यामध्ये पायलटच नसतो. या विमानांचा कंट्रोल हा दूर अंतरावर एका खोलीत बसून वैमानिक करत असतात. त्यामुळे शत्रूकडून ही विमाने पाडली गेली तरी यातून कोणतीही जीवित हानी होत नाही. कोणत्याही लष्करी तळावर बसून वैमानिक हे विमान जगात कुठेही उडवू शकतात. उपग्रहांच्या साहाय्याने या विमानांशी संपर्क ठेवला जातो. ही विमाने अनेक टन वजनाचे बॉम्ब घेऊन जाऊ शकतात. अमेरिकेकडे संपूर्णपणे शस्त्रसज्ज असलेली अनेक ड्रोन विमाने आहेत. अमेरिकेने या विमानांचा वापर गेल्या दोन दशकांमध्ये अनेक युद्धांमध्ये केला आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर असो किंवा अफगाणिस्तानातील तालिबानी तळ असोत, या सर्व ठिकाणांवर अमेरिकेने ड्रोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. नुकत्याच झालेल्या अझरबैजान-आर्मेनिया युद्धामध्येदेखील ड्रोन्सचा वापर हा अझरबैजानच्या विजयात निर्णायक ठरला होता.
हे ही वाचा:
भारताला ही ड्रोन विमाने मिळाल्याने चीन आणि पाकिस्तानला सीमांवर कोणत्याही प्रकारे हालचाली करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागेल.