पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला क्षयरोग मुक्त करण्याचे स्वप्न २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे हा दावा करण्यात आला आहे. क्षयरोगा विरोधातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, २ सप्टेंबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली असून याला आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार तसेच सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री उपस्थित होते. जन ‘जन को जगाना है, टिबी को हराना है’ अशी घोषणा यावेळी देण्यात आली.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील या बैठकीत सहभाग घेतला होता. या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना आपल्या भागात होणाऱ्या क्यायरोग निर्मूलनाच्या उपाय योजनांची माहिती देण्यास सांगितले. जेणेकरून या देवाण घेवाणीतून सर्व राज्यांमध्ये उत्तमोत्तम उपक्रम राबवले जाऊ शकतील.
हे ही वाचा:
देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?
धक्कादायक! घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर महिन्याभरात ४० अपघात
जीएसटी संकलनाची कोटी कोटीची झेप!
ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही
तर क्षयरोग मुक्तीचे अभियान हे जनउपक्रम म्हणून राबवायचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी क्षयरोग निर्मूलनासाठीच्या अभियानात मदत करु शकतील, अशा लोकांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे असे ते म्हणाले. क्षयरोग निर्मूलन चळवळीच्या कामात कोविड संसर्गामुळे असलेले धोके लक्षात घेऊन, कोविड लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे निर्देशही आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. त्यासाठी राज्यांतील भाजी विक्रेते, इतर किरकोळ विक्रेते आणि हातगाडीवाले अशा छोट्या व्यावसायिकांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याचे निर्देश देण्यात आले.