ब्रिटनच्या सुरक्षित देशांच्या यादीत ‘भारत’!

भारत आणि जॉर्जिया या दोन देशांचा यादीमध्ये समावेश

ब्रिटनच्या सुरक्षित देशांच्या यादीत ‘भारत’!

ब्रिटन सरकारने भारताला सुरक्षित देशांच्या विस्तारित यादीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये अवैध मार्गाने येणाऱ्या भारतीयांच्या परतपाठवणीच्या प्रक्रियेला वेग येईल. तसेच, ब्रिटनमध्ये शरण मागण्याची त्यांची शक्यताही संपुष्टात येईल. बुधवारी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सादर करण्यात आलेल्या मसुद्यात भारत आणि जॉर्जिया या दोन देशांना यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे.

देशाच्या इमिग्रेशन यंत्रणेला मजबूत करणे आणि सुरक्षेसंबंधी निराधार दावे करणाऱ्या लोकांना प्रणालीचा दुरुपयोग करण्यापासून रोखणे, हा या प्रस्तावाचा उद्देश असल्याचा ब्रिटनच्या गृह कार्यालयाचा दावा आहे. ‘आपल्याला सुरक्षित देशांमधून ब्रिटनमध्ये अवैध यात्रा करणाऱ्या लोकांना रोखायचे आहे,’ असे ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांनी सांगितले.

हे ही वाचा: 

‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’

वरळी सी लिंकवर गाड्या धडकल्या तीन मृत्यू

रेव्ह पार्टीमध्ये सापांची व्यवस्था गायक फाझिलपुरियाने केली!

उद्धव ठाकरे यांनी केला सरन्यायाधीशांचा अवमान; ठाकरेंविरुद्ध अवमानाच्या खटल्यासाठी परवानगीची मागणी
‘या यादीचा विस्तार केल्यामुळे ज्या व्यक्तींना या देशात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना येथून जलदगतीने बाहेर काढण्यास मदत मिळेल. तुम्ही अवैध मार्गाने येथे राहात असाल, तर तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही, हा स्पष्ट संदेश यातून दिला गेला आहे. अवैध प्रवासाविरोधातील लढाईमध्ये हे पाऊल एक महत्त्वाची भूमिका बजावेल,’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भारत आणि जॉर्जिया या दोन देशांना सुरक्षित मानण्याचा अर्थ हा असेल की, जर कोणी व्यक्ती या देशातून अवैध मार्गाने येत असेल तर ब्रिटिश शरणार्थी यंत्रणा त्यांच्या दाव्याला स्वीकार करणार नाही,’ अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिटनने सुरक्षित म्हणून जाहीर केलेल्या देशांत अल्बानिया, स्वित्झर्लंड, युरोपीय सं

Exit mobile version