आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत भारत तिसरा

सहा सुवर्णपदकांसह २७ पदके मिळवून भारत तिसऱ्या स्थानी

आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत भारत तिसरा

आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये सहा सुवर्णपदकांसह २७ पदके मिळवून भारताने पदतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. या पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर जपान तर, दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

थायलंडमधील एशियन ऍथलिट चॅम्पियनशिपमध्ये अखेरच्या दिवशी २८ वर्षीय आभा खटुआ हिने गोळाफेकमध्ये तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली. तिने चौथ्या प्रयत्नात १८.०६ मीटर अंतरावर गोळाफेक करण्याची कामगिरी केली. तिने स्वत:चाच १७.१३ मीटरचा विक्रम मोडला आणि रौप्यपदक कमवाले. तर, चीनची साँग जियायुआन (१८.८८ मीटर) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर, ज्योती याराजी आणि पारुल चौधरी यांनीदेखील रौप्यपदकाची कमाई केली. आभाने जिचा विक्रम मोडला, त्या मनप्रीत कौरला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.

भारताने सहा सुवर्णांसह १२ रौप्य आणि नऊ ब्राँझ पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने आठ रौप्य आणि पाच ब्राँझसह एकूण १३ पदकांवर नाव कोरले. जपान १६ सुवर्णांसह ३७ पदके मिळवून अव्वल राहिला तर आठ सुवर्णांसह २२ पदके घेऊन चीन दुसऱ्या क्रमांकावर होता.

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटरच्या अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरलेल्या २३ वर्षीय याराजीने २०० मीटरच्या शर्यतीत रौप्य पदकावर नाव कोरले. २३.१३ सेकंदांची वेळ साधत तिने तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. सिंगापूरच्या वेरोनिका शांती परेरा (२२.७०) अव्वल ठरली.

शुक्रवारी ३००० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या पारुल चौधरीने ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने १५ मिनिटे आणि ५२.३५ सेकंद वेळ नोंदवली. तर, सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युमा यामामोटो हिने १५ मिनिटे ५१.६१ सेकंदांची वेळ नोंदवली. तर १६ मिनिटे ३.३३ सेकंद वेळ नोंदवून अंकिताने ब्राँझ पदकावर नाव कोरले.
गुलवीर सिंगने पाच हजार मीटर शर्यतीत १३ मिनिटे ४८.३३ सेकंदांची वेळ नोंदवत ब्राँझ पदक मिळवले. तर, भालेफेक मध्ये डीपी मनू याने ८१.०१ मीटरचे अंतर गाठून रौप्यपदकाची कमाई केली.

तर, पुरुषांच्या ४x४०० रिले शर्यतीत भारताच्या अमोल जेकब, मुहम्मद अजमल, मिजो कुरियन चॅको आणि राजेश रमेश या धावपटूंनी तीन मिनिटे आणि १.८० सेकंदांची वेळ नोंदवून रौप्य पदक कमावले. श्रीलंकेने तीन मिनिटे १.५६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, महिलांच्या ४x४०० रिले शर्यतीत रेझोआना मालिक हीना, ऐश्वर्या मिश्रा, ज्योतिका दांडी आणि सुभा वेंकटेशन यांनी ब्राँझची कमाई केली.

हे ही वाचा:

असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, हंडवारामध्ये ३३ वर्षांनी उघडली चित्रपटगृहे

शुभमन गिलला झुकते माप का दिले जात आहे?

मोमो खाण्याच्या पैजेनंतर तरुणाचा मृत्यू

सुवर्णपदक विजेते खेळाडू

Exit mobile version