भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

भारतीय हवाई दल (IAF)  आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांनी शुक्रवारी ओडिशातील बालासोर येथे सुखोई-३० लढाऊ विमानातून देशातील पहिल्या संपूर्णपणे भारतात विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बची (LRB) यशस्वी उड्डाण चाचणी केली.

१०० किलोमीटरचा पल्ला असलेला एलआर बॉम्ब १० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या आयएएफच्या लढाऊ विमानातून डागण्यात आला. डीआरडीओच्या रिसर्च सेंटर (आरसीआय) द्वारे डिझाइन आणि विकसित केलेला, एलआर बॉम्ब हजार किलोग्रॅमचे वॉरहेड वाहून नेऊ शकतो.

लेझर मार्गदर्शनाचा वापर (Laser Guided Missile) करून, बॉम्बने सकाळी ११.०० च्या सुमारास समुद्राच्या आत असलेल्या लक्ष्य श्रेणीला धडक दिली, सर्व मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली.

कारगिल युद्धापासून ते २०१९ मध्ये बालाकोटमधील ऑपरेशन बंदरपर्यंत, भारत इस्त्रायली लेझर-गाइडेड बॉम्ब वापरत आला आहे. एलआर बॉम्बची यशस्वी चाचणी भारताला त्याच्या हद्दीत राहून १०० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या लक्ष्यांना उच्च अचूकतेने मारा करण्यास सक्षम बनवते.

हे ही वाचा:

मोदी-पोप बैठकीत काय चर्चा होणार?

आर्यन खानची आता होणार सुटका

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’

पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’

एलआर बॉम्बची यशस्वी उड्डाण चाचणी भारताने पोखरण रेंजवरून डीआरडीओ स्मार्ट अँटी-एअरफिल्ड वेपन (SAAW) ची चाचणी केल्यानंतर एका दिवसाने आली. हे १०० किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. एअरफील्ड रनवेची नासधूस करण्यासाठी डिझाइन केलेले, SAAW १२५ किलोचे वॉरहेड वाहून नेऊ शकते. डीआरडीओने जानेवारीमध्ये एअरफिल्डविरोधी शस्त्राची शेवटची चाचणी केली होती.

यशस्वी चाचण्या भारतीय सशस्त्र दलांना मोठी ताकद आणि मोठी चालना देणारी ठरू शकते. विशेषत: अशा वेळी जेव्हा चीन या प्रदेशात आक्रमक भूमिका घेत आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांशी संबंधित डीआरडीओ, हवाई दल आणि इतर टीमचे अभिनंदन केले. गेल्या शुक्रवारी, डीआरडीओने चांदीपूर, ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणीतून अभ्यास हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेटची यशस्वीपणे उड्डाण चाचणी केली.

Exit mobile version