भारताने सौर उर्जा निर्मितीच्या बाबतीत नवा उच्चांक गाठला आहे. भारत अपारंपारिक उर्जा स्रोतांना अनन्यसाधारण महत्त्व देत असताना, उर्जा क्षेत्रातून आलेली एक बातमी आशादायक आहे.
उर्जा क्षेत्रातील सकारात्मक बातमी म्हणजे देशातील एकूण उभारण्यात आलेली सौर उर्जा १०० गिगावॅटच्या वर गेली आहे. सध्या भारतातील एकूण सौर उर्जा निर्मिती ३८३.७३ गिगावॅट इतकी झाली आहे.
भारताने गेली काही वर्षे सातत्याने अपारंपारिक उर्जा स्रोतांना महत्त्व द्यायला सुरूवात केली आहे. त्याचे परिणाम म्हणून आता भारत उभारलेल्या सौर उर्जेच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. भारताचा उभारलेल्या सौर उर्जा क्षमतेबाबत पाचवा क्रमांक आहे आणि उभारलेल्या पवन उर्जा क्षमतेमध्ये चौथा क्रमांक आहे.
हे ही वाचा:
एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?
…तरच गाड्यांना परवाने द्या! कोर्टाने सुनावले…वाचा
सायन- पनवेल मार्गावर म्हणून आहे अंधार!
संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले
त्याबरोबरच २७ जुलै रोजी भारताने सौर उर्जा उत्पादनाचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला होता. या दिवशी देशातील एकूण सौर उर्जा उत्पादन ४३.१ गिगावॅट एवढे झाले होते.
दरम्यान, भारताती सध्या तयार सौर उर्जा निर्मिती क्षमता १०० गिगावॅटच्या पलीकडे गेली आहे. त्याबरोबरच भारतात ५० गिगावॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प निर्माणाधीन आहेत तर २७ गिगावॅट प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहेत.
भारताने मोठ्या प्रमाणातील उर्जा निर्मिती अपारंपारिक उर्जा स्रोतांवर नेण्याचे ठरवले आहे. भारताने ४५० गिगावॅट उर्जा २०३० पर्यंत अपारंपारिक उर्जा स्रोतांतून निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याचा उपयोग भारताला वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी होणार आहे. भारताने स्वतःचे कार्बन फुटप्रिंट २००५ च्या ३०-३५ टक्क्यांनी कमी करण्याचे ठरविले आहे.