पॅलेस्टाइनच्या अस्तित्वाला पाठिंबा, पण हमासला विरोधच!

भारताने व्यक्त केली स्पष्ट भूमिका

पॅलेस्टाइनच्या अस्तित्वाला पाठिंबा, पण हमासला विरोधच!

पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राज्याच्या स्थापनेला भारताचा पाठिंबा असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राज्याच्या स्थापनेला भारत चर्चा करण्यास तयार असेल परंतु दहशदवाद कोणत्याही प्रकारे मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.आज गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अरिंदम बागची म्हणाले, भारताला एक सार्वभौम, स्वतंत्र आणि सुरक्षित पॅलेस्टाईन पाहिजे आहे ज्यामध्ये मान्यताप्राप्त सीमारेषा असतील आणि त्या इस्रायलसोबत सहअस्तित्वात असतील.इस्रायल आणि पॅलेस्टानी दहशतवादी संघटना यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान त्यांचे हे वक्तव्य आले आहे.इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची म्हणाले की, हमासने केलेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणूनच भारत त्याकडे पाहतो, असे ते म्हणाले.

भारत इस्रायलला शस्त्रांची मदत करेल की नाही या प्रश्नावर बागची म्हणाले की, भारताकडून अशी कोणतीही विनंती झालेली नाही किंवा भारताकडून अशी कोणतीही मदत केली जात नाही, सध्या भारतीयांना सुरक्षितपणे आणण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा:

नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे घसरले; पाच ठार, ८० जखमी

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

भारतीयांच्या सुटकेसाठी‘ऑपरेशन अजय’

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

ऑपरेशन अजय अंतर्गत पहिले चार्टर फ्लाइट आज इस्रायलला पोहोचणार आहे. उद्या हे विमान सुमारे २३० नागरिकांना घेऊन भारतासाठी रवाना होईल. गरज भासल्यास हवाई दलाचीही मदत घेतली जाईल, असे ते म्हणाले.बागची पुढे म्हणाले की, इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय नागरिक आहेत, त्यापैकी काही विद्यार्थी आहेत. आम्ही तेथे राहणाऱ्या भारतीयांना दूतावासात नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, एक भारतीय जखमी झाल्याची माहिती आहे. तो हळूहळू बरा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version