भारताने केली पिनाका आणि १२२ एमएम कॅलिबर रॉकेटची यशस्वी चाचणी

भारताने केली पिनाका आणि १२२ एमएम कॅलिबर रॉकेटची यशस्वी चाचणी

भारताकडून डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे पिनाका आणि १२२ एमएम कॅलिबर या दोन रॉकेट्सची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. २४ जून आणि २५ जून २०२१ असे दोन दिवस या रॉकेटचे टेस्टिंग झाले आहे. ही दोन्ही रॉकेट्स भारतात तयार करण्यात आली आहेत. ओरिसातील किनारपट्टी जवळच्या चंदीपुर भागातून या रॉकेटची चाचणी करण्यात आली आहे.

पिनाका रॉकेटची चाचणी करताना एका वेळी २५ रॉकेट सोडण्यात आले असून परीक्षणाच्या सर्व निकषांवर हे रॉकेट खरे उतरले आहे. या रॉकेटची क्षमता लक्षात घेता ते एका वेळेला ४५ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरचे लक्ष अचूक भेदू शकते. तर १२२ एमएम कॅलिबर रॉकेटची चाचणी करताना एकूण चार रॉकेट सोडण्यात आली. या रॉकेटनेही चाचणी दरम्यान पात्रतेचे सारे निकष पूर्ण केले आहेत. हे रॉकेट एका वेळेला चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले लक्ष्य भेदण्याची क्षमता बाळगतात.

हे ही वाचा:

करावे तसे भरावे…नारायण राणे बरसले

अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात

संजय राऊत वाजवतात राष्ट्रवादीची सुपारी

शरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण

या दोन्ही रॉकेटच्या यशस्वी चाचणीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. ही दोन्ही रॉकेट्स भारतीय सैन्याच्या ताफ्यात जमा झाल्यामुळे भारतीय सैन्याची शस्त्रसज्जता चांगलीच वाढली आहे.

Exit mobile version