भारतीय नौदल होणार आता आणखी ‘स्मार्ट’

भारतीय नौदल  होणार आता आणखी ‘स्मार्ट’

सोमवारी भारताने ओडीसा येथील बालासोर येथे सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड ऑफ टॉरपीडो (SMART) यशस्वीपणे लाँच केले आहे. या क्षेपणास्त्रामध्ये घातक पाणबुड्यांना नष्ट करण्याची क्षमता असून या क्षेपणास्त्रामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. या क्षेपणास्त्राने सर्व चाचण्या यशस्वी पूर्ण केल्या आहेत.

संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने (डीआरडीओ) सांगितले की, ही प्रणाली पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आली आहे जी पारंपारिक टॉर्पेडोच्या रेंजच्या पलीकडे आहे. स्मार्टच्या (SMART) चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व क्षमतांचे प्रात्यक्षिक पाहण्यात आले असून यामध्ये स्मार्ट यशस्वी झाल्याचे झाले आहे. स्मार्ट ही प्रगत क्षेपणास्त्रावर आधारित टॉरपीडो डिलीव्हरी प्रणाली आहे, असे डीआरडीओने सांगितले. लवकरच स्मार्ट नौदलात दाखल होणार आहे.

हे ही वाचा:

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत?

अंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका

‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक

श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

स्मार्टची (SMART) वैशिष्ट्ये

स्मार्ट हे एक अँटी- शिप क्षेपणास्त्र आहे. यामध्ये कमी वजनाचा टॉरपीडो बसवलेला असतो, जो पेलोड म्हणून वापरला जातो. या दोघांची ताकद मिळून सुपरसॉनिक अँटी- सबमरीन क्षेपणास्त्र तयार होते. यामध्ये पाणबुडी नष्ट करण्याची क्षमता आहे. स्मार्टची मारक क्षमता तब्बल ६५० किमी इतकी आहे.

Exit mobile version